Wardha : वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा अपघात, 10 जण जखमी

Wardha : वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा अपघात, 10 जण जखमी

सर्वच जण झोपेत असताना अचानक नागपूर अमरावती महामार्गावरील पालोरा फाट्याजवळ स्कुल बसच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने बस दुभाजकाला धडकताच पलटी झाली.
Published by :
shweta walge
Published on

भूपेश बारंगे,वर्धा: अमरावती नागपूर महामार्गावर पालोरा फाट्याजवळ वऱ्हाड घेऊन जाणारी क्र. महा 27 ए 9886 स्कुल बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नवरदेवाचे नातेवाईक स्कुल बसमध्ये बसवून विवाहकरिता जात असताना ही घटना घडली आहे. ही घटना आज 17 डिसेंबरला पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नवरदेवाचे विवाह नागपूर येथिल महालक्ष्मी सभागृह येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास पार पडणार होते. याकरिता नवरदेवाचे नातेवाईक स्कुल बसमध्ये बसवून विवाहकरिता जात असताना सर्वच जण झोपेत असताना अचानक नागपूर अमरावती महामार्गावरील पालोरा फाट्याजवळ स्कुल बसच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने बस दुभाजकाला धडकताच पलटी झाली. यात जवळपास 15 ते 20 जण प्रवास करत असताना यातील बसचालकसह दहा जण जखमी झाले आहे. पहाटेच्या दरम्यान सर्वच जण झोपेत असताना स्कुल बसचा अपघात घडला.

रजनी रामेश्वर विल्हेकर (वय65), रंगराव कृष्णा विल्हेकर (वय 64), एकनाथ बाजीराव विल्हेकर (वय57), सुनंदा रामनाथ विल्हेकर (वय 40), अनुज सुरेश विल्हेकर (वय32), अर्चना मारोती गराडे (वय 42), स्वप्नील रमेश विल्हेकर (वय 32), मंगला रघुनाथ विल्हेकर (वय 54), स्कुल बस चालक या अपघातात जखमी झाले. सर्वाना प्राथमिक उपचारासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वाना अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी कारंजा पोलिसात स्कुल चालक याच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालून अपघात घडला याप्रकरणी कारंजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली लीलाधर उकंडे , उमेश खामनकर, किशोर कापडे करत आहे. या स्कुल बस अपघातातील चालक घटनास्थळवरून पसार झाला असून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची पोलिसांनी सांगितले.

Wardha : वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा अपघात, 10 जण जखमी
घाटकोपर येथील पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

प्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कुल बस चालवण्यासाठी परवाना देण्यात येतो मात्र त्याठिकाणी स्कुल बस मालक सर्रास वाहनाचा दुरुपयोग करून आर्थिक फायद्यासाठी या वाहनाचा वऱ्हाडी नेआन करण्यासाठी वापर केला जातो.पहाटे घडलेल्या अपघातात 10 जण किरकोळ जखमी झाले असले तरी मोठी दुर्घटना टळली.काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com