वर्ध्यात दिवसाढवळ्या घरफोडीत 40 लाखाचा ऐवज लंपास

वर्ध्यात दिवसाढवळ्या घरफोडीत 40 लाखाचा ऐवज लंपास

70 तोळे सोन्यासह दीड किलो चांदीवर अज्ञात चोरट्याने मारला डल्ला.

भूपेश बारंगे|वर्धा: जिल्ह्यातील कारंजा शहरात आज दुपारच्या सुमारास कुलूप बंद घरात अज्ञात चोरट्याने 40 लाखाचा सोन्यावर डल्ला मारला आहे.ही घटना शहरातील न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या घरात सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

शहरातील धान्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांच्या घरात कोणी नसताना कुलूप उघडून अज्ञात चोर घरात शिरून 40 तोळ्याचे बिस्कीट ,30 तोळेचे मंगळसूत्र, बांगड्या,इतर ऐवज व दीड किलो चांदी सह 2 लाख नगद रुपयांची चोरी करण्यात आल्याची माहिती अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

अग्रवाल कुटुंब हे नागपूर येथे गेले असताना दिवसभर धान्य दुकानात अशोक अग्रवाल उपस्थित होते. सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान दुकानातून घरी जात असताना दुचाकीवर दोन जण जवळ येऊन विचारणा करण्यात आली. त्यावेळेस काहीकाळ त्यांनी अग्रवाल यांना थांबविले.त्यानंतर अग्रवाल हे घरी गेले असता घराच्या दरवाजा कुलूप बंद होता. कुलूप उघडून घरात शिरले असते त्यांना चोरी झाल्याचा भास झाला. त्यांनी तात्काळ पत्नीला माहिती देऊन नागपूर येथून बोलाऊन घेतले यावेळेस पत्नी ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत कारंजा पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्यात आली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तक्रार दाखल केल्यानंतर चोरी मध्ये काय काय चोरीला गेले हे कळेल.

नगद व काही सोन बचावले

घरात लाखो रुपयाच्या जवळपास नगद घरात होती. तर सुनेचे गळ्यातील गोफ उघड्यावर ठेवले होते.त्याच्या खाली जवळपास दीड लाख रूपायचे नगद होते.मात्र चोरट्याने जे माहिती होते तिथेच हात साफ करून निघून गेल्याने लाखो रुपये चोरी पासून बचावले असल्याचे सांगण्यात आले.

अज्ञात चोरट्याची शिताफीने चोरी..

घराला लावलेल्या कुलुपाची चाबी अगोदरच चोरट्यांकडे असल्याने स्वतः चोरटा घरात कोणी नसताना कुलूप चाबीने उघडून घरात शिरून काचेच्या शोकेस मध्ये असलेल्या टेडी मध्ये 40 तोळ्याचे बिस्कीट ठेवण्यात आले होते.तेच चोरट्याने चोरून नेले तर बेडरूम मध्ये लाकडी कपाटच्या खाली ठेवलेलं 30 तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीची चोरी करण्यात आली.तर नगद दीड लाख चोरीला गेले...

चोरट्याला घरातील माहिती कशी?

आज कुटुंब बाहेर गावी जात आहे.अख्ख कुटुंब खासगी दवाखान्यात तपासणीला जात असून घरी कोणीच राहणार नाही.त्यावेळीच चोरी करण्याची माहिती चोरट्याला कशी? तर दोघाला सोन्याची कुठे ठेवले याची माहिती होती. घरात पत्नी व मुलाला माहिती असलेले सोन चोरीला गेल्याने कुटुंब पडले विचारात.नवऱ्याला सोन कुठ ठेवलं याची कल्पना नव्हती.तर ही माहिती चोराकडे कशी हा प्रश्न पोलिसासह अग्रवाल कुटुंबाना पडला आहे.

15 वर्षांपूर्वी याच घरात चोरी

यापूर्वी याच घरात खिडकी तोडून 15 वर्षांपूर्वी चोरीची घटना घडली होती.त्यावेळी कुटुंब घरात असताना चोरट्यानी कुटुंबाला आतमध्ये बंद करून धान्याची रक्कम चोरी केली होती.. जवळपास त्यावेळी सहा ते सात जण घरात शिरून चोरी करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com