ताज्या बातम्या
Wardha : कारंजा तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू
वर्धा: कारंजा तालुक्यात शेतातील विहिरीत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू
भूपेश बरंगे वर्धा|
वर्धा येथील कारंजा तालुक्यात वाघोडा येथे शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याला विहिरीतून पाण्याचा आवाज आला. शेतकऱ्याने विहिरीमध्ये पाहताच त्याला बिबट्या आता दिसला आणि हा संपुर्ण प्रकार समोर आला.
सध्या बिबट्याचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले ऐकायला मिळत आहे. वर्ध्यामधील कारंजा तालुक्यातील एका शिवारात, शेतकरी विश्वनाथ कामडी यांच्या विहीरमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली होती. ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र विभागाला सांगताच, वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून रेस्क्यू करू लागले होते. तब्बल रेस्क्यू ४ ते ५ चालेला होता. बिबट्याला पाण्यातून बाहेर काढण्यास उशिर झाल्याने बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.