खाकीतल्या कर्मचाऱ्यांची माणुसकी! अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांना बुजवले
गोपाल व्यास, वाशिम
वाशिम जिल्ह्यातुन जाणाऱ्या नागपूर संभाजी नगर महामार्गावरील काटेपूर्णा पुलाची दुरवस्था झाली असून मोठं-मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, राजकीय पुढाऱ्यांनी रास्ता रोको केला तरी बांधकाम विभाग जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर खाकीतल्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत रस्त्यावर पडलेले मोठं-मोठे खड्डे बुजवून आदर्श निर्माण केला आहे.
यावर खाकीच्या कर्तव्यासह आपली जवाबदारी चोखपणे पार पाडत व वाहतूक सुरळीत व अपघात टाळण्यासाठी पुलावर पडलेल्या खड्डे बुजवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक कौतुक करणार का असा प्रश्न ग्रामस्थ व वाहन चालक करीत आहे.
वाहतूक पोलीस कर्मचारी म्हटलं की सर्वच त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहतात मात्र सर्वच कर्मचारी सारखे नसतात हेच प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा पुलावर पडलेल्या खड्ड्याने संबंधित नॅशनल हायवे कडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला मात्र अद्याप कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने अखेर जऊळका पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत रोडवर पडलेले मोठं मोठे खड्डे बुजवले आहे.