एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूरची शाळा अविरत सुरु...

एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूरची शाळा अविरत सुरु...

एकीकडे सरकारी शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असताना दुसरीकडे कार्तिक मात्र न चुकता रोज वेळेच्या आता शाळेत हजर राहून आपलं शिक्षण पूर्ण व्हावं आणि पुढं चालून काही तरी बनाव ह्या हेतूने आपली शाळा गाठतो.

गोपाल व्यास|वाशिम: जिल्हा परिषदेची एखादी अशी शाळा बघितली का ज्यामध्ये एक विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला धडे देण्यासाठी एक शिक्षक आहे. तर अशी शाळा वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर येथील गावात असून गेल्या काही दशका पासून इंग्रजी शाळेकडे पालकांचा शिक्षण देण्यासाठी कल वाढतोय त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा ओस पडायला लागल्या मात्र घरची परिस्थिती बेताची अन पालकांना इंग्रजी शाळा न परवडणाऱ्या असल्याने एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूर ची शाळा अविरत सुरु आहे.

गणेशपूर गावातील जिल्हा प्राथमिक शाळेची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. या शाळेत एक विद्यार्थी आहे.याच विद्यार्थ्यांला शिकविण्यासाठी शाळेत एकच शिक्षक आहे. या शाळेत विद्यार्थी पटसंख्या नसल्याने एकाच विद्यार्थ्यांला शिक्षणाचे धडे दिल्या जातात तर गावातील मुलं जवळच्या कारंजा शहरातील इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी जात असतात. कार्तिक याच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घ्यावं लागतं आणि शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने कार्तिक सुध्दा नियमित शाळेत येत असतो.

शिक्षणाची ओढ असेल तर मार्ग आपोआप सापडत जातात विद्यार्थ्यांची संख्या देखील एक असली तरी शाळा मात्र विद्यार्थ्यांसाठी उघडली जाते. आणि शिक्षक देखील एक असले तरी शिक्षण देखिल रोज शिकवील्या जाते कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारकडून ठोस उपाययोजना देखील राबविल्या जातात. एकीकडे सरकारी शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असताना दुसरीकडे कार्तिक मात्र न चुकता रोज वेळेच्या आता शाळेत हजर राहून आपलं शिक्षण पूर्ण व्हावं आणि पुढं चालून काही तरी बनाव ह्या हेतूने आपली शाळा गाठतो.

कार्तिक शेगोकार विद्यार्थी

गणेशपूर हे ग्रामीण भागातील गाव असून येथील लोकसंख्या दीडशे च्या जवळपास आहे,याच गावातील काही मुलं कारंजा येथे शिक्षण घेण्यासाठी जातात मात्र कार्तिक हा तिसऱ्या वर्गात शिकत असून तो गावातील जिल्हा परिषद शाळेत जातो आणि त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या एकच आहे.तो नियमित शाळेत जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करत असतो. कार्तिक च्या आईने बोलतांना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com