Washim : Special Report  विहिरी कागदावर, आरोप अधिकाऱ्यांवर; नेमंक प्रकरण काय?

Washim : Special Report विहिरी कागदावर, आरोप अधिकाऱ्यांवर; नेमंक प्रकरण काय?

वाशिम घोटाळा: शेतकऱ्यांच्या नावे बनावट विहिरी, अधिकाऱ्यांवर आरोप; सरकारी फसवणूक उघड
Published by :
Team Lokshahi
Published on

सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मोठ्या घोटाळ्याची आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे विहिरी दाखवण्यात आल्या. त्यासाठी लाखो रुपयांची बिलंही काढण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर छदामही जमा झालेला नाही.

शेतकरी सतीश पंजाबराव देशमुख त्यांनी एका शेतकऱ्याकडून २०१३ मध्ये शेती विकत घेतली. त्यानंतर शासकीय योजनेतून सिंचन विहिरीसाठी त्यांनी अर्ज केला. मात्र आधीच्या शेतकऱ्याने याच शेतात विहिरीचा लाभ घेतला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर देशमुखांनी सगळी कागदपत्रे मिळवली. अशी कोणतीही विहिर बांधण्यात आली नसल्याचं उघड झालं. धक्कादायक म्हणजे, आधीच्या शेतकऱ्याच्या नावे एक लाखाची रक्कमही अदा करण्याचं आल्याचं समोर आले आहे.

शेतकरी सतीश देशमुख यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे, म्हणाले, "विहीर खोदल्यानंतरच पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता, परंतु ही प्रक्रिया न पाळता अधिकाऱ्यांनी संगनमत नसलेल्या विहिरीची बिलं काढली. सतीश देशमुख यांनी आता गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे".

गटविकास अधिकारी, पंचायत समिती किशोर लहाने लोकशाही मराठीसोबत साधताना म्हणाले, "वाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत कागदोपत्री विहिरी दाखवून संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी विचारत आहेत".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com