Washim ZP School : Special Report जिल्हा परिषदेची अशी शाळा पाहिलीय का?
शाळेच्या भिंतीवर साधुसंताचे आणि महापुरुषांचे विचार असलेली अनोखी शाळा जिल्हापरिषदेची आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होते. कारण ही शाळा आहेच मुलांना आवडणारी आहे. या शाळेनं 'माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानात पाहिला क्रमांक पटकावला आहे. वाशिमपासून 8 किलोमीटरवर असलेल्या साखरा गावातल्या शाळेबाबत सांगत आहोत. ही शाळा जिल्हापरिषदेची आहे. परंतू तिचे स्वरुप एखाद्या आंतरराष्ट्रीय शाळेला लाजवेल आहे, असे आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांचा 51 लाखांच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अंबादास करे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला म्हणाले की, "या शाळेत 40 शिक्षक आहेत. ते सुद्धा अगदी टापटीप आणि स्वच्छ गणवेशात येतात. शिक्षक सुट्टीच्या दिवशीही मुलांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होण्यास मदत होते."
शाळेचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला म्हणाले की, "भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या शाळेचा आणि शिक्षकांचा अभिमान वाटतो. याच शाळेत शिक्षण घेऊन नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थींची संख्या मोठी आहे. त्या विद्यार्थ्यांच्या फोटोंचा फलक या शाळेचं यश अधोरेखित करतो".
विद्यार्थींनी सुद्धा लोकशाही मराठीसोबत संवाद साधला म्हणाल्या की, "शाळा मुलांच्या मनावर संस्काराची पेरणी करण्याचं काम करत असते. इथं मिळालेली शिदोरी प्रत्येकाला आयुष्यभर पुरत असते. म्हणून आयुष्याचा आणि करीअरचाही पाया रचणाऱ्या या शाळा प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे वाशिमच्या साखरा गावातील या शाळेनं आदर्श विद्यार्थी घडवण्याचा वसा घेतलाय. त्यातूनच इथले विद्यार्थी यशाची पताका रोवतायत. म्हणून ही शाळा महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे आलीय".