देशाच पहिल्यांदाच फक्त पुण्यात होणार 'हा' प्रकल्प
Admin

देशाच पहिल्यांदाच फक्त पुण्यात होणार 'हा' प्रकल्प

पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे.देशात प्रथमच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.

बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेबल तसेच घरगुती घातक मिश्र कचऱ्यावर ऑप्टीकल सेन्सर वापरून आधी विलग केला जाणार आहे. ओला कचरा जैविक कचरा करण्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर कचऱ्यावर प्रक्रीया करून प्लाझ्मा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन वायू तयार केला जाणार आहे.

रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे. डीबुट पध्दतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे 350 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली होणार आहे. त्याद्वारे 150 टन आरडीएफ तर 9 मेट्रिक टन हायड्रोजन निर्मिती होणार आहे.

कंपनी 350 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तसेच लॉजिस्टीक व इतर सुविधांसाठी 82 कोटी खर्च करणार आहेत. पुणे येथील हडपसर इंडस्ट्रियल एस्टेट मध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com