मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात आज पाणीकपात

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात आज पाणीकपात

मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण मुंबईतील काही भागांत पाणीकपात करण्यात येणार आहे. सोमवारपासून ही पाणीकपात केली जाणार आहे. आज सोमवारी 18 डिसेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभागा अंतर्गत येणाऱ्या भागात पाणी कपात होणार आहे. सोमवारी म्हणजे 18 डिसेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे

मुंबईतील काही भागांमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभागा अंतर्गत येणाऱ्या भागात पाणी कपात होणार आहे. मुंबई महापालिकेच्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com