मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पाणी कपातीचे संकट, धरणातील पाणीसाठी 28 टक्क्यांवर
उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक जिह्यांमध्ये पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.
मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत असून मुंबईवर पाणीकपातीचं संकट आहे. सातही धरणांत 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईत भातसा, मोडक सागर, तानसा, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी ही सात धरणं आहेत. या धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. जेव्हा पाणीसाठा जास्त प्रमाणात कमी होईल त्यावेळी भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून हा साठा घेण्यात येणार असल्याचे जल अभियंता विभागाने सांगितल्याची माहिती मिळत आहे.