Mumbai: मुंबईतीत 'या' भागात उद्या 3 तास पाणी पुरवठा राहणार बंद

Mumbai: मुंबईतीत 'या' भागात उद्या 3 तास पाणी पुरवठा राहणार बंद

दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागातील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागातील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या सकाळी 3 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवार, २४ मे रोजी पहाटे 4:30 ते सकाळी 7:30 या तीन तास कालावधीतील पाणीपुरवठा बंद राहणार.

नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन केले आहे. रेसकोर्स आवारातील 1200 मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या दुरुस्ती कामामुळे जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा शुक्रवार, दिनांक 24 मे 2024 रोजी पहाटे 4:30 ते सकाळी 7:30 या तीन तास कालावधीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम आज दिनांक 23 मे 2024 रोजी रात्री 10 वाजता हाती घेण्यात येणार आहे.

संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com