मुंबई आणि पुण्यात 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

मुंबई आणि पुण्यात 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे मुंबईत येत्या गुरुवारी- शुक्रवारी (2-3 मार्च) आणि पुण्यात गुरूवारी (2 मार्च) काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे मुंबईत येत्या गुरुवारी- शुक्रवारी (2-3 मार्च) आणि पुण्यात गुरूवारी (2 मार्च) काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईतील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि घाटकोपर परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

तर पुण्यात रामटेकडी ,ससाणे नगर ,हडपसर गावठाण, फुरसुंगी, सातव वाडी मगरपट्टा, वानवडी, केशवनगर मुंढवा गाव, गाडीतळ अशा मुख्य भागात राहणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com