मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप
Admin

मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप

मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत.

मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत.मुंबई वॉटर टँकर असोसिएशन संप पुकारल्यानंतर मुंबईतील अनेक हॉटेल, मॉल्स आणि रुग्णालयांना फटका बसत आहे. मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी ही फक्त मुंबईत केली जात असल्याने या विरोधात 8 फेब्रुवारी मध्यरात्री पासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला आहे.

अनेक ठिकाणी सोसायटी सुद्धा या वॉटर टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या अडचणींना या संपामुळे सामना करावा लागत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर सोसिएशनची चर्चा सुरू आहे.

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याने हा संप पुकारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com