ताज्या बातम्या
खार, वांद्रे भागात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खार, वांद्रे भागात शुक्रवारी पाणीबाणी असणार आहे. खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे काम करण्यात येणार आहे.
यासोबतच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कामे शुक्रवारी करण्यात येणार आहेत. या दिवशी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही कामे सुरू असणार आहेत.
या पार्श्वभूमीवर एच-पश्चिम विभागातील वांद्रे आणि खारच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.