Uddhav Thackeray: 24 ऑगस्टचा बंद मागे घेत आहोत पण..., काय म्हणाले उद्धव ठाकरे?
जे गुन्हे घडतायेत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेरगारांबद्दल तत्परता दाखवून त्यांना ताबतोबीने सजा देण्याजी सुद्धा तत्परता आपण दाखवावी. माननीय उच्च न्यायलयचं निर्णय हा आम्हाला मान्य नाही, परंतू कोर्टाचा आदर हा ठेवावा लागतो. ह्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो. काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो. कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे. या घटना अशा आहेत आणि हे बंदच कारण वेगळं होतं. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता ही वेळ नाहीये आणि म्हणून आता आम्ही असं ठरवलेलं आहे. जसे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की, उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरुर घेत आहोत मात्र, राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळे फीती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याचं गोष्टीचा निषेध करतील. बंदला तुम्ही बंद म्हटलंय आम्ही तोंडचं बंद ठेवतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एकूणच या लोकशाही मानण्याऱ्या देशामध्ये 'फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन' ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही? मोर्चे, संप, हडताल यालासुद्धा बंदी केली आहे का? लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटनातज्ञ नी आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजे. मी दुपारच्या माझ्या आवाहानात आव्हान आणि आवाहन यात फरक आहे. ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून मी जे जनतेला आवाहन केलं होतं. कारण जिथे कायदा रक्षणकराला असमर्थ ठरवून कायदा असमर्थ नसतो. कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का बेजबाबदारपणे वागत असतील, ज्याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्याने आज आम्हाला उद्याचा बंद करु नका असे आदेश दिले त्यानी काल सरकारला विचारलं होतं. तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही? भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे, मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगडफेक करा, बंद करा, वाटेल ते करा, हिंसाचार करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही जी गोष्ट घडली आहे ती प्रत्येक घरातील चिंतेची गोष्ट आहे. प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय, वकिलांना काय प्रत्येकाला सगळ्यांना आपापल्या कुटुंबांची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे. आपल्या बहिणीची काळजी, आपल्या मुलीची काळजी, आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं, तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे. आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा हा बंद केला होता. पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणचे की आमचं तोंडचं आम्ही बंद ठेवतो असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे. तोंडाला काळी फीती लावून, हाताच काळे झेंडे घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला कोणी मना करु शकत नाही आणि त्यालाही मनाई होणार असेल तर जनतेच्या न्यायामध्ये दाद मागितल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. एकूणच आता जे काही घटना घडतायेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहे? हे जे कोणी याचिकाकर्ते कोर्टात गेले आहेत त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहिल. घडलेल्या गुन्ह्याची आणि अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावर राहिल आणि उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का? हा सुद्ध एक प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.