ताज्या बातम्या
Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange : 'गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं' बावनकुळेंचे वक्तव्य
बावनकुळे वक्तव्य: गणेशोत्सवानंतर आंदोलन योग्य, हिंदू उत्सवात गालबोट नको.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. महसूलमंत्र्याची पत्नी, मुलगी आणि सून यांनी बाप्पाच्या पर्यावरणपूरक मंडपाची सजावट केली. वेगवेगळ्या पाना-फुलांनी सजवलेल्या मंडपात बाप्पाचे आगमन झाले. यावेळी चंद्रशेखर बाबनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. दरम्यान त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य केले आहे.
त्यावेळी बाबनकुळे म्हणाले की, "आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे,हिंदू समाज प्रत्येक गल्ली बोळात गणेश उत्सव साजरा करतात,मुंबई आणि कोकणात साजरा करतात. गणेश उत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं, ज्या राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे त्यांनी विचार करायला पाहिजे. हिंदूच्या सर्वात मोठ्या उत्सवात गालबोट लागू नये याची काळजी घ्यायला पाहिजे."