Lokshahi Marathi Sanwad 2025 | 
Ravindra Dhangekar : "आम्हाला निवडणुकीसाठी गुन्हेगार लागतात" लोकशाही मराठीच्या 'पश्चिम महाराष्ट्र संवाद'कार्यक्रमात धंगेकरांचं मोठं विधान

Lokshahi Marathi Sanwad 2025 | Ravindra Dhangekar : "आम्हाला निवडणुकीसाठी गुन्हेगार लागतात" लोकशाही मराठीच्या 'पश्चिम महाराष्ट्र संवाद'कार्यक्रमात धंगेकरांचं मोठं विधान

लोकशाही मराठीच्या "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमा शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षातील रविंद्र धंगेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षातील रविंद्र धंगेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

निवडणुकीसाठी गुंड आम्हाला जवळ ठेवावे लागतात, "निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागते. असं महत्त्वाच विधान त्यांनी केलं आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी विशेषत: पुण्यातच गुन्हेगार आणि त्यांच्याकडून होणारी गुन्हेगारी वाढत चालेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या गुन्हेगारांसोबत राज्यातील नेत्यांचे देखील फोटो व्हायरल होताना दिसतात. एवढचं नव्हे तर त्यांच्यासोबत संबंध असल्याचं देखील समोर येत.

याचपार्श्वभूमिवर रविंद्र धंगेकर म्हणाले की, "गुन्हेगार आम्हाला निवडणुकीसाठी लागतात आणि निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही कृत्य केलं असेल त्याच्यावर पांगघरुण टाकण्याचं काम आम्हाला कराव लागत. पण, गुन्हेगाराला आपल्या जवळ कितपत ठेवलं पाहिजे हे प्रत्येकाला कळायला हव. निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला हे सगळ कराव लागत. मी हे जाहिरपणे यासाठी बोलतोय कारण मी त्या सिस्टिमचा भाग आहे. मगं ते ह्याच्या त्याच्यासोबत बसलो की, फोटो बाहेर पडतात".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com