Jain Boarding : 'युक्तिवादापूर्वी अभ्यास करायला वेळ हवाय' न्या. कलाटोंची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी

धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल धर्मदाय आयुक्तलायाला पाठवलाय, सूत्रांच्या माहितीनुसार या अहवालात वादग्रस्त जागेवर मंदिर असल्याचं नमूद करण्यात आलंय.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण

  • धर्मादाय आयुक्तांसमोर आज होणार सुनावणी

  • व्यवहार रद्द न झाल्यास 1 नोव्हेंबरपासून करणार आंदोलन

  • जैन समाजाने घेतला निर्णय

धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल धर्मदाय आयुक्तलायाला पाठवलाय, सूत्रांच्या माहितीनुसार या अहवालात वादग्रस्त जागेवर मंदिर असल्याचं नमूद करण्यात आलंय..तसचं जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या विशाल गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून आता माघार घेतली आहे.'आम्ही धर्म विकू देणार नाही' धर्मादाय आयुक्तालयाबाहेर जैन बांधवांची घोषणाबाजी केली आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी दुपारी २.०० वाजता सुनावणी पुन्हा सुरू होईल त्यामुळे अंतिम निर्णय आज होण्याची दाट शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com