Dattatray Bharne : 'नैसर्गिक आपत्तीवर शेतीसाठी उपाययोजना काय? कार्यक्रमात कृषीमंत्री काय म्हणाले?
लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील उपस्थिती लावली होती.
'नैसर्गिक आपत्तीवर शेतीसाठी उपाययोजना काय? कार्यक्रमात कृषीमंत्री काय म्हणाले? " पाहायला गेलं तर पाऊस पहिले देखील पडत होता हवामानात वबदल झाल्यामुळे पाऊस एकाच दिवशी पडत आहे. एकाच दिवशी पाऊस जास्त झाल्यामुळे नद्या आणि नाल्याना पूर येतो. पूर आल्यामुळे नदीचे पात्र भरत आहे आणि गावांमध्ये शेतांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे सरकारला भविष्यात या सर्व गोष्टींचा विचार हा करावा लागणार आहे. नद्यांच्या क्षेत्रात सध्या अतिक्रमण केलं जात आहे. याचा सरकारला विचार करावा लागणार आहे. कारण हवामान बदलामुळे परिस्थिती अशीच बदलत राहणार आहे.