Shravan Somvar : श्रावणात महिन्यात आरोग्य टिकवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?

Shravan Somvar : श्रावणात महिन्यात आरोग्य टिकवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?

श्रावण महिन्यात उपवासासोबतच आहारात योग्य बदल करून शरीराला आवश्यक पोषण देणे महत्त्वाचे आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

श्रावण महिना आला की अनेक उपवास आणि व्रत वैकल्ये सुरु होतात. या काळात आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेतली तर त्या उपवासाचा त्रास न होता उलट आपल्याला फायदाच होईल. श्रावण महिन्यात उपवासासोबतच आहारात योग्य बदल करून शरीराला आवश्यक पोषण देणे महत्त्वाचे आहे. फळे, दुग्धजन्य पदार्थ, आणि उपवासाचे पदार्थ यांचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. श्रावण महिना म्हणजे उपवासांची मोठी रेलचेलच असते . पण हे उपवासामुळे आपल्याला थकवा तर जाणवणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणूनच उपवासाचा थकवा जाणवू नये म्हणून काही पथ्ये जरूर पाळली पाहिजेत. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो, ज्यामध्ये भक्तगण विविध धार्मिक विधी, व्रत आणि उपवासांचे पालन करतात.यावेळी आहाराच्या बाबतीत विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

उपवास आणि पोषक आहार

श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपवासाची रेलचेल असल्यामुळे त्या काळात आपल्या शरीराला पोषक आहार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या काळात आंबा, केळी, पपई, द्राक्षे, सफरचंद, जांभूळ, नाशपाती, रताळे आणि मनुका यांसारखी फळे खाणे फायदेशीर आहे. त्याचबरोबर दूध, दही, पनीर, ताक आणि लस्सी यांचे सेवन करावे.राजगिरा, शेंगदाणे, रताळे, आणि साबुदाणा यांचा आहारात समावेश करावा. ह्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळण्यास मदत होते.

हायड्रेशन (Hydration)

श्रावण मासात उपवासाच्या वेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, भरपूर पाणी आणि हर्बल टी पिण्याने योग्य शरीर डिहायड्रेट होते. जितके विविध प्रकारचे फळांचे ज्युस आहारात घेतल्यास शरीराला पोषक तत्वांबरोबरच आपले शरीरातील पाण्याची पातळीही स्थिर राहते.

पॅकेज फूड टाळा

उपवास काळात कोणतेही पदार्थ बनवण्याचा त्रास नको म्हणून पॅकेज फूडचा सर्रास वापर सध्या होत आह. तर तो प्रकार टाळा. त्यामुळे शरीराला त्याचा मोठा त्रास होऊ शकतो. प्रिझर्व्हेटीव्ह्स आणि कृत्रिम घटक यामुळे शारीरिक आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे ताजे आणि घरी बनवलेले अन्नपदार्थ निवडणे हे केव्हाही योग्यच आहे.

श्रावण महिना हा उपवासासोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा देखील आहे. त्यामुळे, आहारात योग्य बदल करून तुम्ही निरोगी आणि उत्साही राहू शकता. जर तुम्हाला काही specific health issues असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित व्यायाम करा ज्यामुळे ज्यामुळे शरीर उत्साही राहील. पुरेशी विश्रांती घ्या. ज्यामुळे शरीराला आराम मिळेल.ह्या काही महत्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर श्रावणातल्या उपवासामध्येसुद्धा आपले शरीर निरोगी आणि हेल्दी राहू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com