Pankaja Munde on Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. असं असताना या घटनेचा राजकीयवर्तुळात वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणेचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर कारवाई सुरु आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक तसेच सत्ताधारी मित्रपक्षातील काही नेते यांच्याकडून केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या...
विधाकांनी असं म्हटलं आहे की, त्यांच्यावर अशी वेळ आली होती त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मग आता धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत तर त्यांनी देखील त्यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरं देऊ शकतात... त्यांच्या निर्णय तेच घेतील मी काही बोलू शकत नाही... माझे काही प्रोटोकॉल आहेत, मी लहान मंत्री आहे...
जो कुणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे - पंकजा मुंडे
मी छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते.. महाराष्ट्रामध्ये एसआयटी लावण्याचं जे पत्र आहे ते मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे आणि त्याची सोफ्ट कॉपी मी जाहीर करु शकते, जिथे व्यक्त व्हायचं तेंव्हा व्यक्त झाले.. माझ्या जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीची निघृण हत्या होते. त्याप्रकरणामुळे मी त्याठिकाणी एसआयटी लावण्याची मागणी देखील केली आहे... मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं तपास होईल आणि यात कोणाची ही हयगय करणार नाही...
आरोपीला कडक शिक्षा करु असं त्यांनी सांगितले आहे.... मी मंत्री आहे, अशात आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे... मोर्चा काढत असू तर आपणच आपल्या सरकारवर अविश्वास दाखवतोय... माझ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय तर आम्हीच प्रश्न उभे करत असू तर ते त्यांच्यावरच संशय घेण्यासरखं होईल.. यात राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. ह्याच्या तून काही वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये...हे अधिकारी मी आणले का?
पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी आणले होते... मात्र पालकमंत्री होते ते पण बोलत आहेत शिक्षा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे... मला माहिती नाही कोण आहे त्यात मग मी कसा आरोप करु कोणावर...आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, माझा कार्यकर्ता होता तो.....त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं मला योग्य वाटत नाही, त्याच्यापेक्षा संतोष देशमुख याला न्याय मिळवून देण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.