Devendra Fadanvis : "एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तर टोकाची...." मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची भूमिका काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचपार्श्वभूमिवर महायूतीमध्ये अंतर्गत कुरघोडींमुळे महायुतीची काय रणनिती असणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निवडणुकी संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठक ठेवली आहे. आज कोकण विभागाची आढावा बैठक घेतली आहे. युतीचे सर्व अधिकार हे जिल्ह्यांना दिले आहे. जिथे जिथे युती शक्य आहे तिथे युती होईल. समजा एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी टोकाची टीका आणि कटोरता करू नये. त्यामुळे मैत्रीत कुठेही कटुता येऊ नये असे ही आदेश दिले आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे की ही निवडणूक स्वबळावर लढावावी. सगळ्याच कार्यकर्त्यांची मागणी अशीच असते."
दरम्यान भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) आज बैठक असेल. त्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक होतेय. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला महत्त्व, बिहारमधील जागा वाटप व उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.