आचारसंहिता म्हणजे काय? 5 वाजता लागू होताच काय करायला मनाई? जाणून घ्या सविस्तर
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण तापले आहे. कोणत्या पक्षाच्या हाती सत्ता जाणार, महापौर कोण होणार आणि भविष्यातील राज्यकारणाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा विधानसभा निवडणुकांचे संकेत हे महापालिका निकालांतूनच मिळतात.
आज राज्यभरातील निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून संध्याकाळी 5 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रचार सभा, मिरवणुका आणि मोठे कार्यक्रम थांबणार आहेत.
आचारसंहिता म्हणजे काय?
निवडणूक काळात सर्व पक्ष आणि उमेदवारांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि समानता राखावी, यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता. ही संहिता लागू असताना सरकार कोणत्याही नवीन योजना जाहीर करू शकत नाही, तसेच सरकारी यंत्रणांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही.
आचारसंहितेचा उद्देश
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे असतात. गैरप्रकार, दबाव आणि गोंधळ टाळण्यासाठी आचारसंहिता उपयोगी ठरते. राज्यात 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. आता मतदारांच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
🔹 राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू
🔹 निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले
🔹 कोणत्या पक्षाच्या हाती सत्ता जाणार याकडे सर्वांचे लक्ष
🔹 महापौर कोण होणार? याची उत्सुकता शिगेला
🔹 या निकालांवरून भविष्यातील राज्यकारणाची दिशा ठरण्याची शक्यता
🔹 अनेकदा विधानसभा निवडणुकांचे संकेत महापालिका निकालांतून मिळतात

