Sibling Divorse म्हणजे काय? 'या' गायिकेच्या पोस्टने वेधलं सर्वाचे लक्ष
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर, सोनू कक्कर आणि तिचा भाऊ संगीतकार गायक टोनी कक्कर ही भांवडे सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनूने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, या पोस्टमध्ये तिने लिहिले की ती तिच्या भावडांसोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे. मात्र त्यानंतर सोनूने ही पोस्ट काहीवेळातच डिलीट केली. दरम्यान सोनूच्या या पोस्टमध्ये सिबलिंग डिव्होर्स (Sibling Divorce) या शब्दाचा वापर केला. सोनूच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सिबलिंग डिव्होर्स नक्की असतो का? याबद्दल जाणून घ्या...
सिबलिंग डिव्होर्स म्हणजे काय?
पती- पत्नीमधील घटस्फोट याबद्दल सर्वांना माहिती आहे. परंतू आता भाऊ- बहिणींमध्ये येणाऱ्या दुराव्यासाठी सिबंलिग घटस्फोट (Sibling Divorce)असा उल्लेख केला. ज्यावेळेस भाऊ- बहीणीचे नाते बिघडते त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्याला भावंडांचा घटस्फोट म्हटले जाते आहे. अशा परिस्थितीमध्ये भाऊ आणि बहिणींचे एकामेकांशी असणारे नाते संपुष्टात येते. याआधी गायक अरमान मालिक याच्या भावाने त्याच्यासोबत आणि आई- वडिलांसोबतचे नाते तोडले आहे.
सोनू कक्करने नेमंक पोस्टमध्ये काय लिहिले?
मिळालेल्या माहितीनुसार, सोनुने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "तुम्हाला सर्वांना कळवताना खूप दु:ख होत आहे, की मी आता दोन सुपरस्टार गायक टोनी कक्कर आणि नेहा कक्कर माझी भावंडं नाही आहेत. माझा हा निर्णय भावनिक वेदनांमधून आला आहे. आज मी खरोखरच निराश आहे". असे म्हणत तिने पोस्ट शेअर केली आणि काहीवेळात ती डिलीट केली आहे.