Eknath Shinde : जी काही मदत आहे, ती दिली जाईल..., एकनाथ शिंदेंचं शेतकऱ्यांना आश्वासन

Eknath Shinde : जी काही मदत आहे, ती दिली जाईल..., एकनाथ शिंदेंचं शेतकऱ्यांना आश्वासन

शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शेतकऱ्याच्या मदतीसाठी थेट बांधावर पोहोचले आहेत. 50 ट्रक भरुन जीवनावश्यक साहित्याच वाटपं एकनाथ शिंदे यांनी केलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर पोहोचले

  • 50 ट्रक भरुन जीवनावश्यक साहित्याच वाटपं एकनाथ शिंदेंकडून वाटपं

  • सरकार यापूर्वी सुद्धा शेतकऱ्याच्या मागे उभ राहिलयं...

शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शेतकऱ्याच्या मदतीसाठी थेट बांधावर पोहोचले आहेत. 50 ट्रक भरुन जीवनावश्यक साहित्याच वाटपं एकनाथ शिंदे यांनी केलं. कारंजा गावात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “कारंजा गावात आपण आहोत. परंडा तालुक्यात खूप मोठ नकसान झालेलं आहे. यात प्रचंड शेतीच नुकसान झालय. घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूच नुकसान झालेलं आहे. म्हणून आता नदीकगाठी जी गाव आहेत, गावातील जमिनी खरडून गेल्या आहेत. एकंदरीत प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. 98 हजार हेक्टर शेतीच नुकसान झालेलं आहे. हे असमानी संकट आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे सरकारच काम आहे. सरकार यापूर्वी सुद्धा शेतकऱ्याच्या मागे उभ राहिलय,आजही उभं आहेत. जी काही तातडीची मदत आहे ती आधी केली जाईल. नंतर पाऊस पाणी कमी झाल्यावर पंचनामे करुन जी काही मदत आहे, ती दिली जाईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“तातडीची मदत तात्काळ देऊ. नंतर पंचनामे करुन जी मदत ठरवलीय ती देऊ. कारण नुकसान मोठं आहे. अटी शिथिल कराव्या लागतील. शेतकऱ्याच्या मागे उभं रहावं लागेल” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “अशा काळात राजकारण करणं दुर्देव आहे. मदत होणं आवश्यक आहे. सिंगल कपड्यावर लोक बाहेर आहेत. त्यांना कपडे देणं, जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन भांडी देण्याच काम आपलं कर्तव्य आहे. यात कोणी राजकारण आणू नये. सध्याच्या स्थितीत जेवढी मदत करता येईल, तेवढी केली पाहिजे. आसमानी संकट आहे. राजकारण बाजूला ठेऊन मदत केली पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांनी एक किलो धान्य कधी शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन दिलय का?

मदत साहित्यावर फोटो, चिन्ह लावून मदत करतात या आरोपावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “कार्यकर्त्याने त्या ठिकाणी मदत वाटप केलं, तर त्या बॅगेत काय मदत साहित्य आहे, यावर लक्ष द्या. जे फोटोवर लक्ष देतात त्यांना राजकारण करायचं आहे” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. ज्यांनी आरोप केले, त्यांनी एक किलो धान्य कधी शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलय का? असा प्रश्न मध्येच तानाजी पाटील यांनी विचारला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com