CM Fadnavis On Sharad Pawar : 'संकट येतं त्यावेळी तुमची ...' फडणवीसांची पवारांवर टीका
शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रेला कालपासून नागपूरमधून सुरु झाली आहे. या यात्रेला पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थितीत होते. नागपूरमध्ये शरद पवार यांच्या हस्ते या मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे,
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ,"ओबीसींची शक्ती काय आहे? हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. वर्षानुवर्ष त्यांनी ओबींसी समाजाला केवळ पाण्यात पाहिलं. कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. समाजाला केवळ भाषणाचे राजकारण दिलं म्हणूल आज ज्यावेळी ओबीसी समाज दुरावलेला आहे, हे लक्षात आलं. फक्त यात्रा काढून फायदा नाही, त्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहत हे दिसू द्या.. ज्यावेळी ओबीसी समाजावर संकट येतं त्यावेळी तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा अशी असते. आता आठवण असेल, तर ते कृतीतून दिसेल."