नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? अदानी समूहाने सांगितली तारीख
Admin

नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? अदानी समूहाने सांगितली तारीख

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.अदानी समूहाकडे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह ७ विमानतळांचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी सांगितले की, ९ कोटी प्रवासी आणि २.५ दशलक्ष मेट्रीक टन माल हाताळण्याएवढी वार्षिक क्षमता नवी मुंबई विमानतळाची असणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच येत्या २० वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सरासरी ८.५ टक्क्यांनी वाढेल. यानुसार २०२४ पर्यंत प्रवाशांची संख्या ही १ अब्जापर्यंत जाईल. व नवी मुंबई विमातळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. उर्वरित टप्प्यांचा विकास हा आगामी १५ वर्षांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या पाहता टप्प्या टप्प्याने केला जाईल. असे बन्सल यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com