Bihar Election Result : बिहार निवडणुकीचा निकाल कधी? कुठे? पाहता येणार...

Bihar Election Result : बिहार निवडणुकीचा निकाल कधी? कुठे? पाहता येणार...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार लावला. मतदान प्रक्रिया पार पडली असून आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निकालाची.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • बिहार निवडणुकीचा निकाल कधी? कुठे? पाहणार

  • बिहारच्या 243 जागांसाठी मतमोजणी होणार

  • बिहारची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाते ?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार लावला. मतदान प्रक्रिया पार पडली असून आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निकालाची. आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार असून पोल अगोदरच आली आहेत. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. आता याचा फायदा कोणाला होणार हे चित्र स्पष्ट होईलच. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले.

सर्वांचे लक्ष आता आजच्या 14 नोव्हेंबर रोजी बिहारच्या 243 जागांसाठी मतमोजणी होणार आहे, याकडे आहे. कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाच्या पदरी निराशा पडते, हे अवघ्या काही तासात कळेलच. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत येतील की माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता हाती घेईल हे आज स्पष्ट होईलच. सकाळी मतमोजणी सुरू होईल, त्यानंतर सुरुवातीचे कल समोर येऊ लागतील. दुपारपर्यंत बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल. नितीश कुमार यांच्या बाजूनेच निकाल लागेल असे काही पोलमध्ये पुढे आलंय. जशी जशी निकालाची वेळ जवळ येतंय तशी लोकांमधील उत्सुकता वाढताना दिसत आहे.

मतमोजणी 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. यावेळी, पोस्टल मतपत्रिका मोजण्याचे नियम बदलण्यात आले आहेत; मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वी त्यांची गणना केली जाईल. हळूहळू करून निकाल हाती पडतील. साधारणपणे उद्या दुपारपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सत्ता नेमकी कोणाला मिळेल हे कळेल. अधिकृत निकाल अपडेटसाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइटला (results.eci.gov.in) भेट द्या. बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देखील लाईव्ह ट्रेंड उपलब्ध असतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com