PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार?
केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येतात. हा निधी तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यावर डीबीटीद्वारे वितरित केला जातो. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात मदत होते. आत्तापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, 19 व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काय आहे ही योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.