Elections
Elections

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीला सुनावणी निकालावर निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे.
Published by :
Published on

साल २०२० मध्ये कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. तसेच त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी असा सवाल उपस्थित झाला आहे. मुंबई महानगरपालिकेवरील प्रशासकाच्या कारभाराला येत्या ७ मार्च रोजी तब्बल तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्च २०२२ संपुष्टात आली होती. येत्या ७ मार्चला महानगरपालिकेवरच्या प्रशासकीय कारभाराला तीन वर्षे पूर्ण होतील.

चार वर्षांपासून निवडणुकीच्या सुनावणीवर 'तारीख पे तारीख' सुरुच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष वेधलं आहे. सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निकालावर निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे.

राज्यातील २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित?

महापालिका

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी या पालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

जिल्हा परिषद

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com