Weightloss Food : 'या' पदार्थांच्या सेवनाने तुमचे वजन होईल कमी

Weightloss Food : 'या' पदार्थांच्या सेवनाने तुमचे वजन होईल कमी

पण केवळ व्यायाम करणेच पुरेसे नसते तर त्यासाठी पुरेसे आणि योग्य जेवण घेणेदेखील गरजेचे असते.
Published by :
Shamal Sawant
Published on

वजन कमी करण्यासाठी आजकाल खूप पर्यायांचा अवलंब केला जातो. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही वजन कमी येत नाही. त्यामुळे आता वजन कमी करायचे असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल वेगवेगळी माहितीदेखील समोर येते. वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लगतात. पण केवळ व्यायाम करणेच पुरेसे नसते तर त्यासाठी पुरेसे आणि योग्य जेवण घेणेदेखील गरजेचे असते. पण आहार नक्की काय घ्यावा? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्यामुळे आता वजन कमी करण्यासाठी कोणते सुपरफूड खावे? त्याबद्दल जाणून घेऊया.

हिरव्या भाज्या :

पालक, मेथी, शेपू, तांदळ आशा अनेक भाज्या शरीरासाठी फायदेशीर असतात. या भाज्या खाल्ल्याने तुमच्या शरीराला खूप फायदे होतात. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटदेखील राहतात. जितक्या जास्त हिरव्या भाज्या तुम्ही खाल्ल्या तितके वजन करण्यास मदत होते.

अंडी :

तुम्हाला जर वजन कमी करायची असेल तर दिवसाला एक दोन अंडी खाणे खूप गरजेचे असते. अंड्यांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे अंडी खाल्ल्यास बराच काळ भूक लागत नाही.

मासे :

मासे हा परिपूर्ण आहार असतो. वजन कमी करताना शरीरातील शक्ती कमी होते. माश्यांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. तुमचे शरीरदेखील निरोगी राहते.

चिकन ब्रेस्ट :

वजन कमी करण्यासाठी चिकन खाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. यासाठी चिकन ब्रेस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. चिकन उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील.

बटाटे :

बटाट्याने वजन वाढतं असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र बटाटा खाण्याची तुमची पद्धत जर वेगळी असेल तर त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बटाटे शिजवून किंवा उकडून खा.

एव्होकाडो:

एवोकॅडो नक्कीच महाग आहे पण वजन कमी करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. एवोकॅडोमध्ये हृदयासाठी निरोगी चरबी असते जी हृदय आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर असते. त्यात चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे देखील असतात जे आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर असतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com