म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर वाचाच; एक जरी कागदपत्र चुकलं तर...
Admin

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर वाचाच; एक जरी कागदपत्र चुकलं तर...

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या विक्रीसाठी 22 मेपासून अर्ज काढले आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या विक्रीसाठी 22 मेपासून अर्ज काढले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये नागरिकांना तीन गटांमध्ये फॉर्म भरता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी 22 मे रोजी सुरुवात झाली आहे.

महत्त्वाचे कागदपत्र ?

पॅन कार्ड

बँक खात्याचे तपशील

अर्जदाराचा पासपोर्ट

मतदार ओळखपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

अर्जदाराचे आधार कार्ड

अर्जदाराचा जन्म दाखला

महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र

पात्र ड्रायव्हिंग लायसन्स

अर्ज कसा करायचा?

lottery.mhada.gov.in. जा

"नोंदणी करा" म्हणणाऱ्या पर्यायावर क्लिक करा, तुमची सर्व माहिती त्यात भरा

कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा

अर्ज शुल्क ऑनलाइन भरा

सर्व माहिती भरुन झाली की, सबमिट वर टॅप करा

लॉटरी नोंदणी फॉर्म डाउनलोड करा

महत्वाचे

सोडत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात

ऑनलाइन पेमेंट शेवटची तारीख 26-जून-23 रात्री 11:59 वाजता

ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख 26-जून-23 संध्याकाळी 6:00 वाजता

सोडतीची तारीख 18 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून

RTGS/NEFT पेमेंट शेवटची तारीख 28-जून-23 संध्याकाळी 6:00 वाजता

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com