पांढरे केस तोडतायं; थांबा! आधी 'हे' वाचा
डोक्यावरील केस पांढरे होण्यासाठी आता वयोमर्यादेचे बंधंन राहिले नाही. पांढरे केस म्हणजे वयोवृद्ध होण्याचे लक्षण, हा समज आता फोल ठरत आहे. अगदी शाळकरी मुला-मुलींचेही केस पांढरे होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. वेळेपूर्वीच केस पांढरे होत असल्याने नैराश्यात जाणारे तरुण किंवा एकही पांढरा केस असून नये, असे समजणारे चाळीशीतले महिला-पुरुष अनेकदा प्लकरच्या सहाय्याने किंवा हातानेच एक-एक पांढरा केस काढून टाकतात. मात्र असे करणे कितपत योग्य आहे, हे आपण जाणून घेऊया.
पांढरे केस तोडावेत की तोडू नयेत
1. म्हातारपणी वयानुसार केसांना नैसर्गिक रंग प्राप्त करणाऱ्या रंगपेशी कमी झाल्यामुळे केस पिकून पांढरे होतात.
2. मात्र आजकाल ताणतणावामुळेही केसांच्या रंगपेशींवर दुष्परिणाम होताना दिसतो.
3. वयस्कर लोकांचे सर्वच केस पांढरे होतात. मात्र तरूणपणांचे केस कमी प्रमाणात पिकतात.
4. कधी कधी तर एखादा केसच पांढरा झालेला दिसून येतो. अशा वेळी तो पांढरा केस तोडू नये असं सांगण्यात येतं.
5. पांढरे अथवा काळे कोणतेही केस कधीच तोडून अथवा ओढून काढू नये, त्यामुळे तुमच्या हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते.
6. पांढरे केस तोडल्यास पुढे केसांची वाढ खुंटते.