NCP Ministers
NCP Ministers

भुजबळांना डच्चू देत राष्ट्रवादीने कोणाला दिली मंत्रिपदाची संधी?

राज्यमंत्रिमंडळ विस्तारात ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना डच्चू तर इंद्रनिल नाईक यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नागपुरात नव्या मंत्रिमंडळात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. भाजपच्या ३ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या २ मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराने राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यमंत्रिमंडळ विस्तारात ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना डच्चू तर इंद्रनिल नाईक यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

राज्यातले ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे. माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद नाकारलं आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. माणिकराव, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

महायुतीकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी-

  1. हसन मुश्रीफ

  2. धनंजय मुंडे

  3. दत्तात्रय भरणे

  4. आदिती तटकरे

  5. माणिकराव कोकाटे

  6. नरहरी झिरवळ

  7. मकरंद पाटील

  8. बाबासाहेब पाटील

  9. इंद्रनील नाईक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com