Dr. G. Madhavi Lata : भारतातील सर्वात उंच चिनाब पूल बांधणाऱ्या डॉ. जी. माधवी लता कोण? जाणून घ्या त्यांचे योगदान

Dr. G. Madhavi Lata : भारतातील सर्वात उंच चिनाब पूल बांधणाऱ्या डॉ. जी. माधवी लता कोण? जाणून घ्या त्यांचे योगदान

चिनाब रेल्वे पूल हा भारतातील तसेच जगभरातील सर्वात उंच पूलापैकी एक आहे. जगातील सर्वात उंच चिनाब पूलाच्या बांधकामात डॉ. जी. माधवी लता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Published by :
Prachi Nate

चिनाब रेल्वे पूल हा भारतातील तसेच जगभरातील सर्वात उंच पूलापैकी एक आहे. एकूण 1,300 मीटर लांबीच्या या भव्य पुलावरून रेल्वे 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करता येऊ शकते. या प्रकल्पासाठी 22 वर्षांचा कालावधी लागला असून, एकूण 1,486 कोटी रुपयांचा खर्च या पूलासाठी करण्यात आला आहे. पुलाच्या उभारणीत 29,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. चिनाब रेल्वे पूल हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून कनेक्टिव्हिटी आणि विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

1. चिनाब पूलाची माहिती

दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा आणि पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंच असलेल्या चिनाब पूल हा भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वे पूल आहे. या पूलाला आर्च ब्रिज असंही म्हणटलं जात. चिनाब नदीवरील हा पूल नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंच असून 1,315 मीटर लांबीचा आहे. तसेच या पुलाची मुख्य कमान 467 मीटर लांब आहे तर 28,000 मेट्रिक टन स्टीलपासून बनलेली आहे. या पूलाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोकण रेल्वेला देण्यात आली होती.

2. चिनाब पूल कुठे जोडलेला आहे

चिनाब पूल हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे, तसेच पोलीस कटरा ते बनिहाल या मार्गावरील हा एक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या कटरा ते श्रीनगर दरम्यान 5 ते 6 तासांचा सुरु असलेला वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास या पूलामुळे 3 ते 4 तासांचा होणार आहे. त्याचसोबत जम्मू आणि काश्मीरच्या कठीण भूभागातून तसेच देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल.

3. चिनाब पूलाच उद्घाटन कोणी केलं

वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या जगातील सर्वात उंच चिनाब पूलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. 1315 मीटर लांब असलेल्या पूलाला वारं, पाऊस, भूकंप तसेच जटिल भूगर्भशास्त्र, तुटलेले खडक उतार, सैल माती, वारंवार भूकंपाच्या हालचाली अशा समस्यांना सामोरे जाव लागणार आहे. हा पूल कोणत्याही नैसर्गिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

4. डॉ. जी. माधवी लता कोण आहेत

डॉ. जी. माधवी लता या एक प्रख्यात सिव्हिल इंजिनिअर त्याचसोबत भू-तंत्रज्ञान व्यावसायिक आहेत. त्या 2005 ते 2022 दरम्यान पूल पूर्ण होईपर्यंत कार्यरत होत्या. जगातील सर्वात उंच चिनाब पूलाच्या बांधकामात अभियांत्रिकी कामगिरीमागील त्या एक प्रमुख भागीदार आहेत. तसेच त्यांनी या प्रकल्पादरम्यान भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना त्यांच्या संशोधन आणि योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

5. डॉ. जी. माधवी लता यांच चिनाब पूलासाठीच योगदान

डॉ. जी. माधवी लता आयआयएससी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पहिल्या महिला फॅकल्टी सदस्य होत्या. चिनाब पूलासाठी प्रमुख कंत्राटदार तसेच भू-तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांनी या प्रकल्पात आपले योगदान दिले. त्याचसोबत पूलाच्या पायासाठी आणि उतार स्थिर करण्यासाठी बोल्ट, रिटेनिंग सिस्टम डिझाइन आणि स्थापनेवर भर देण्याचं काम लता यांनी केल. साइटच्या भूगर्भीय वास्तवांशी जुळवून घेतलेल्या गतिमान डिझाइन प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करण्याकडे त्यांनी लक्ष दिल. बांधकामादरम्यान प्रकल्प सल्लागार म्हणून पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी सातत्य दाखवले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com