राज ठाकरे यांचा आवडता नेता कोण? राज ठाकरेंनी सांगितले...
Admin

राज ठाकरे यांचा आवडता नेता कोण? राज ठाकरेंनी सांगितले...

मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.

‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. विशेष म्हणजे ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.

यावेळी रॅपिड फायरमध्ये अमोल कोल्हे यांनी ठाकरे यांचे आवडते नेते कोण? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार की पंतप्रधान नरेंद्र मोदी? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला

त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी आवडण्यापेक्षा दोघांच्या कामाची तुलना करू शकेल. दोघांमध्ये पाहिलं तर कामाला वाघ आहेत. तसं फार कोणी नाही, कारण मी ज्यांना आजपर्यंत मानत आलो ते बाळासाहेब ठाकरे आहेत. राजकीय मतभेद, भूमिका आवडणं, न पटन हे स्वाभाविक असून याच्यासाठी आपण व्यक्तीवरती फुल्या मारत नाही. मी कोणत्याही व्यक्तीवर टीका करताना त्यामध्ये मी माझं 100 टक्के टाकलेलं असतं. मी टीका करताना त्या व्यक्तिच्या भूमिकेवरती टीका करत असतो. असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com