संजय राऊतांनी आरोप केलेला राजा ठाकूर नेमका आहे तरी कोण?
Admin

संजय राऊतांनी आरोप केलेला राजा ठाकूर नेमका आहे तरी कोण?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावरुन आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे राऊत यांनी पत्रात उल्लेख केलेला राजा ठाकूर नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजा ठाकूर हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा जवळचा समजला जातो. राजा ठाकूर यांचं खरं नाव रविचंद ठाकूर आहे. राजा ठाकूर हे वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतात. दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजा ठाकूर यांनी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या निमित्ताने शिंदे पिता-पुत्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावण्यात आले होते.

त्याच्यावर हत्या आणि हत्येता प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.राजा ठाकूर हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात या गुंडाची मोठी दहशत आहे. ठाण्यातील विटावा उड्डाणपुलाखाली जानेवारी 2011 मध्ये दीपक पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी राजा ठाकूर याला अटक करून जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर एप्रिल 2019 नंतर तो जामिनावर बाहेर आलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com