Powai Children Kidnapping : मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण ?

Powai Children Kidnapping : मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण ?

धक्कादायक घटना राजधानी मुंबईतील (Mumbai) पवई परिसरात घडली असून 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. गेल्या 4-5 दिवसांपासून येथील एका एक्टींग क्लासेसच्या स्टुडिओमध्ये ही मुले येत होती.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • किडनॅपर रोहित आर्य कोण ?

  • रोहितचे एका प्रोजेक्टमध्ये गुंतले पैसे

  • नेमका प्रकार काय?

धक्कादायक घटना राजधानी मुंबईतील (Mumbai) पवई परिसरात घडली असून 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. गेल्या 4-5 दिवसांपासून येथील एका एक्टींग क्लासेसच्या स्टुडिओमध्ये ही मुले येत होती. मात्र, आज दुपारच्या सुमारास या मुलांना ओलीस ठेऊन किडनॅपरने (Kidnap)व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. रोहित आर्य असं या किडनॅपरचं नाव असून शासनासोबत केलेल्या एका प्रकल्पातून आपली आर्थिक कोंडी झाल्याचं त्याने म्हटलं आहे. दरम्यान, घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस (Police), एनएसजी कमांडो आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मुलांची सुटका केली. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी रोहित आर्यला ताब्यात घेतलं असून या कृत्यामागे नेमकं काय कारण आहे, याचा सखोल तपास केला जात आहे. तत्पूर्वी रोहितने व्हिडिओ बनवत स्वत:बद्दल माहिती दिली होती. मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज/उमुंद्या असेच होत आहे. त्यामुळे, आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केले. आता, पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं किडनॅपर रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. त्यानंतर, सुरक्षा जवानांनी पोलिसांसह गतीमानतेन चक्र फिरवत रोहित आर्यला ताब्यात घेतलं.

कोण आहे रोहित आर्य

रोहित आर्य हा मुंबई पवई परिसरात एक्टींग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भातील काम करतो. सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी सांगतो. 'अप्सरा' नावाने त्याचे युट्यूब चॅनेल आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

रोहितचे एका प्रोजेक्टमध्ये गुंतले पैसे

रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, सरकारकडे त्याचे पैसे आहेत, त्याने लोन काढून शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता. स्वच्छता मॉनिटरसंदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमका प्रकार काय?

पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून सिनेमा, वेब सीरीजसाठी कास्टिंग केले जात होते. त्यासाठी, 17 जणांचे फाइनल कास्टिंग झाले. त्यामुळेच, येथील स्टुडिओत आज 17 मुले आणि दोन पालक उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या वेळेत ही मुले स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर पालक चिंतेत होते. कारण, ही मुले काचेतून आपला हात दाखवत इशारा करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतरच हा किडनॅपिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com