Shivsena Ministers: शिवसेनेतील नवे मंत्री कोण? मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची यादी जाहीर
नागपुरात नव्या मंत्रिमंडळात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र राज्यातले ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे.
माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद नाकारलं आहे. तर भाजपच्या ३ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या २ मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराने राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महायुतीकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या शिवसेनेच्या आमदारांची यादी-
गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटलांनी 1995 ते 1999 या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. 1997 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद जळगांवच्या कृषी समितीच्या सभापती पदावर निवड झाली. गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार आहेत. सलग सहाव्यांदा विधानसभेवर निवड झाली.
दादा भुसे
दादा भुसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली 2004 पासून पाचव्यांदा विधानसभेवर आहेत. शिवसेनेतून अनेक महत्त्वाची खाती हाताळण्याचा अनुभव आहे. ते महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
संजय राठोड
संजय राठौर शिवसेना पक्षाच्या तिकिटावर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. गेल्या 5 विधानसभा निवडनुकीत विजयी झाले. ते महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे आमदार आहे. 2004 ला दारव्ह्यातून विधानसभेवर आहेत.
उदय सामंत
उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली शिवसेनेचा कोकणातील आक्रमक चेहरा आहे. 2004 पासून 2024 पर्यंत रत्नागिरीचे आमदार आहेत. एकनाथ शिंदेचे विश्वासू म्हणून ओळख आहे. ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते.
शंभुराज देसाई
शंभुराज देसाईं 2004 पासून सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभेचे आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागाचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर पाटण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. शंभुराज देसाईंनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली
संजय शिरसाठ
संजय शिरसाट 2022 मध्ये शिंदे सरकार स्थापन झालं तेव्हाच ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते. अखेर विधानसभा निवडणुकीआधी त्यांना सरकारकडून महामंडळाच्या वाटपात सिडकोच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. संजय शिरसाट हे 2000 साली संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर 2001 मध्ये ते सभागृह नेता झाले आणि 2009 मध्ये त्यांना शिवसेनेकडून आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. तेव्हापासून ते सलग चारवेळा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
प्रताप सरनाईक
प्रतापराव सरनाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 1997 साली राजकारणात प्रवेश केला ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघातून 4 वेळा आमदार होते. प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवाळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. चारवेळा आमदार झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
भरतशेठ गोगावले
गोगावले हे सलग चारवेळा महाड विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले आहेत.भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली 1987 ते 1992 पर्यंत पंचायत समितीचे सदस्य आहेत. महाड मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009 मधून पहिल्यांदा विधानसभेवर आहेत. 1996 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
प्रकाश आबिटकर
शिवसेनाचे प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2014, 2019 आणि 2024 असं सलग तीनवेळा आमदार म्हणून जिंकून आले आहेत. प्रकाश आबीडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 2019;च्या बंडामध्ये शिंदेसोबत गेलेले आमदार आहेत. राधानगरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर आहेत.
शिवसेनेच्या २ मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
आशिष जैस्वाल– राज्यमंत्रीपद
आशिष जयस्वाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधून पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार झाले. महाराष्ट्र खिनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आशिष जैस्वाल यांना पहिल्यांचा मंत्रिमंडळात संधी मिळाली असून नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. 2009 मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर ते जिंकून आले होते. तर 2019 मध्ये रामटेक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आले आहेत.
योगेश कदम – राज्यमंत्रीपद
योगेश कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. योगेश कदम हे 2019 आणि आता 2024 असे सगल दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली दापोली मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झाले.