BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण कुणासोबत? कुणाला किती जागा? राजकीय चित्र स्पष्ट

BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण कुणासोबत? कुणाला किती जागा? राजकीय चित्र स्पष्ट

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 2026 च्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

Mumbai Election मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 2026 च्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध पक्षांनी युती-जोडणी अंतिम केली असून संभाव्य जागावाटप आणि निवडणूक गणिते समोर येऊ लागली आहेत. या निवडणुकीत एकूण 227 प्रभाग असून तब्बल 2,516 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुंबईतील एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 3 लाख 44 हजार 31 इतकी आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

  • ठाकरे गट–मनसे–राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी

या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची आघाडी लक्षवेधी ठरली आहे. या आघाडीत

  • शिवसेना (UBT): 165 जागा

  • मनसे: 52 जागा

  • राष्ट्रवादी (शरद पवार): 10 जागा

  • भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती

सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढताना दिसत आहेत.

  • भाजप: 137 जागा

  • शिवसेना (शिंदे): 90 जागा
    मुंबईतील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि केंद्र-राज्य सरकारची ताकद हे या युतीचे प्रमुख मुद्दे आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

स्वतंत्रपणे लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस 94 जागा जागांवर लढत आहे

  • काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी

  • काँग्रेस: 143 जागा

  • वंचित बहुजन आघाडी: 90 जागा

  • इतर मित्रपक्ष: 6 जागा

  • आप, AIMIM आणि समाजवादी पक्ष

आम आदमी पार्टी (AAP) मुंबईत मोठ्या ताकदीने उतरली असून 227 जागांवर लढत आहे.

AIMIM: 45 जागा

समाजवादी पार्टी: 45 जागा

सत्ता कुणाची?

या सर्व आकड्यांमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कोणतीही एक युती स्पष्ट बहुमत मिळवते का, की निकालानंतर नव्या समीकरणांची जुळवाजुळव होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबईचा कौल 16 जानेवारीला स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com