ताज्या बातम्या
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री घेतली कुणाची भेट?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नऊ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजता थेट विधानसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डिस्क्वॉलिफिकेशन याचिका दिली आहे. या याचिकेत या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.