Bihar Election Exit Poll 2025 : कोण होणार मुख्यमंत्री? बिहार निवडणक एक्झिट पोल 2025 एक्झिट पोल्सनुसार बहुमत कोणाला?

Bihar Election Exit Poll 2025 : कोण होणार मुख्यमंत्री? बिहार निवडणक एक्झिट पोल 2025 एक्झिट पोल्सनुसार बहुमत कोणाला?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं असून, राज्यात सत्तेचा खेळ पुन्हा एकदा रंगणार आहे. 243 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का विक्रमी नोंदला गेला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं असून, राज्यात सत्तेचा खेळ पुन्हा एकदा रंगणार आहे. 243 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का विक्रमी नोंदला गेला आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 67.14 टक्के मतदान झालं आहे, जे 2020 च्या तुलनेत अधिक आहे. या वेळी महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक असून, 69% महिला आणि 61% पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

या निवडणुकीत मुख्य सामना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि महागठबंधन (MGB) यांच्यात आहे. मात्र, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने तिसरा महत्त्वाचा कोन तयार केला आहे.

एनडीए : जनता दल युनायटेड (JDU), भाजप (BJP) आणि अन्य सहयोगी पक्ष

महागठबंधन (MGB) : राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस, डाव्या पक्षांचा समावेश

जनसुराज पक्ष (PK) : पहिल्यांदाच विधानसभा रणांगणात

तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून महागठबंधनाचं नेतृत्व करत आहेत, तर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी “जनता बदलाच्या मूडमध्ये आहे” असा दावा करत लढत अधिक रंगवली आहे.

एक्झिट पोल्स काय सांगतात?

मतदान संपताच विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सनी आपापले अंदाज जाहीर केले आणि त्यात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल अशी एकमुखी भविष्यवाणी केली गेली आहे. मात्र आकडेवारीत थोडाफार फरक दिसतो.

मॅट्रिझ – IANS एक्झिट पोल

NDA: 147 – 167

महागठबंधन: 70 – 90

इतर: 5 – 10

पीपल्स इनसाईट

NDA: 133 – 148

MGB: 87 – 102

जनसुराज (JSP): 0 – 2

इतर: 3 – 6

पीपल्स पल्स

NDA: 133 – 159

MGB: 75 – 101

JSP: 0 – 5

इतर: 2 – 13

JVC Polls

NDA: 135 – 159

MGB: 88 – 103

इतर: 3 – 6

पोल डायरी

NDA: 184 – 209

MGB: 32 – 49

इतर: 3 – 5

चाणक्य स्ट्रॅटेजीस

NDA: 130 – 138

MGB: 100 – 108

इतर: 3 – 5

Praja Poll Analytics

NDA: 186

MGB: 50

इतर: 7

महागठबंधनसाठी धोक्याची घंटा

बहुतेक सर्वच एक्झिट पोल्सनुसार महागठबंधनला मोठा धक्का बसणार आहे. 2020 मध्ये ज्या पद्धतीने महागठबंधनने नितीश कुमार यांच्या विरोधात जोरदार लढत दिली होती, त्या तुलनेत या वेळी जनतेचा कल एनडीएकडे वळल्याचं स्पष्ट दिसत आहे. काही पोल्सनुसार काँग्रेस दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचू शकणार नाही, तर RJDची जागा घटण्याची शक्यता आहे.

जनसुराज पक्षाची भूमिका

प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने प्रचार मोहिमेत मोठं आकर्षण निर्माण केलं असलं, तरी एक्झिट पोल्सनुसार त्यांना 0 ते 5 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, त्यांनी राज्यात तिसऱ्या पर्यायाचं बीज नक्कीच पेरलं आहे.

कोण बनेल मुख्यमंत्री?

एक्झिट पोल्सनुसार एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यास नितीश कुमार यांच्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होईल. तथापि, एनडीएच्या आतल्या समीकरणांनुसार भाजपही मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकते. दुसरीकडे, जर निकालात उलटफेर झाला आणि महागठबंधनने आघाडी घेतली, तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

अंतिम निकाल 14 नोव्हेंबरला

सर्वांच्या नजरा आता 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीत बिहारची जनता ‘विकास विरुद्ध रोजगार’, ‘स्थैर्य विरुद्ध बदल’ या मुद्द्यांवर मतदान केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. बिहारच्या रणांगणात एनडीए आघाडीवर असल्याचं एक्झिट पोल्स सांगत असले तरी, बिहारच्या राजकारणात शेवटच्या क्षणी उलटफेरांची परंपरा आहे. त्यामुळे खरा निकाल 14 नोव्हेंबरलाच समोर येईल,

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com