Yogesh Kadam : सचिन घायवळला शस्त्र परवाना का मिळाला? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं स्पष्टीकरण म्हणाले, "जे आरोप झालेत याची सविस्तर महिती..."

Yogesh Kadam : सचिन घायवळला शस्त्र परवाना का मिळाला? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं स्पष्टीकरण म्हणाले, "जे आरोप झालेत याची सविस्तर महिती..."

कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला मिळालेल्या शस्त्र परवान्याच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला मिळालेल्या शस्त्र परवान्याच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीनेच हा परवाना मिळाल्याचा आरोप होत असून, विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, "मी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस शस्त्र परवाना दिलेला नाही. परवाना देण्याची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असून, त्यासाठी संबंधित पोलीस आयुक्तांचा तपशीलवार अहवाल आवश्यक असतो."

सचिन घायवळविषयी बोलताना कदम म्हणाले की, "2015 ते 2025 या दहा वर्षांच्या कालावधीत त्याच्यावर कोणताही नवीन गुन्हा दाखल झालेला नाही. 15-20 वर्षांपूर्वी जे काही गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले होते, त्यातून 2019 मध्ये न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केलं आहे. त्यामुळे त्याच्या अर्जावर निर्णय घेताना कोणतीही गुन्हेगारी नोंद आढळली नव्हती."

कदम यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना पुढे सांगितले की, "मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं नाही आणि भविष्यातही देणार नाही. या प्रकरणात कोणतीही शंका नसेल, यासाठी मी लवकरच कागदपत्रांसह सविस्तर माहिती जनतेसमोर मांडणार आहे."

दरम्यान, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत या परवानगी प्रक्रियेची चौकशी व्हावी आणि दोषी आढळल्यास कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. सध्या या प्रकरणामुळे गृह विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील तपासात सत्य काय आहे, हे स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com