महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का हलवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का हलवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचं सरकार येऊन दोनच महिने झालेत असं म्हटलं. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला गेला असावा. इतकंच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केला असेही शिंदे म्हणाले.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आम्ही राज्यात उद्योग वाढावा यासाठी काम करत आहोत, त्यासाठी केंद्राने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.नव्या उद्योगासाठी जे जे लागतं, ते ते सगळं देण्याचा पूर्ण प्रयत्न नवं सरकार करेल. तसंच उद्योग यावेत, यासाठी काय करायला हवं, याबाबतही केंद्रीय मंत्र्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का हलवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...
Lokshahi
www.lokshahi.com