आफ्रीकन आंबा कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार?

आफ्रीकन आंबा कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार?

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातून निर्यात होणारा आंबा याला देशासह परदेशात मोठी मागणी असते.

निसार शेख, रत्नागिरी

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातून निर्यात होणारा आंबा याला देशासह परदेशात मोठी मागणी असते. खवय्ये नेहमीच कोकणातील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. थेट आक्रिकन आंबा नवी मुंबईच्या मार्केटमध्ये दाखल झाला आहे. आफ्रीकन आंबा कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.

 आफ्रिकेतील मलावी या ठिकाणावरून मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर येथील आंब्याची आवक सुरू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील काहीवर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. पंधरा वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आब्यांच्या झाडांची कलम आफ्रिकन देश मलावी मध्ये घेऊन जाऊन साडेचारशे एकर वर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

 या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्याने या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. मलावी आंबा महाराष्ट्र कोकणातील आंब्याला मोहर यायला सुरुवात होते म्हणजे नोव्हेंबर मध्येच मलावी आंबा तयार होऊन भारतामध्ये उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याला चांगली किंमतही मिळत आहे. मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन हजार रुपये ते पाच हजारां पर्यंत आहे. 800 बॉक्सची आवक एपीएमसी बाजारात झाली आहे.

त्यामुळे भविष्यात हा आंबा कोकणातील हापूस आंब्याला स्पर्धा करणार हे यावरून दिसत आहे.अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मलावी आंबा कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच गोड रसाळ आहे तसेच कोकणातील शेतकऱ्यांनी देखील निर्यातक्षम सेंद्रिय आंबा तयार करावा कमीत कमी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करून निर्यातक्षम आंबा कोकणातून उपलब्ध झाला पाहिजे अशा आंब्याला प्रदेशातील मार्केट उपलब्ध होईल. असे जाणकारांचे म्हणणे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com