MC Election Mahayuti: निवडणुका भाजप स्वबळावर लढणार? शिवसेनेत कुजबूज सुरु
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजप आता तयारी करत असल्याची कुजबूज शिवसेनेत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून ही महायुतीसोबत निवडणुक लढवण्याच्या वाटचालीवर असल्याच पाहायला मिळत आहेत. ज्या बैठका भाजप घेत आहेत त्या स्वबळावर लढण्याच्या सुचना भाजप देत आहेत. पण महापालिका निवडणुका कशा काढायच्या यामध्ये अजूनही महायुतीचा संभ्रम पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर आता राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
संजय राऊतांचा शिंदेंसह अमित शाहांवर घणाघाती निशाणा
संजय राऊत म्हणाले की, अमित शाहा यांनी शिवसेनेमध्ये फुट पाडली. आता एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आह ती खरी अमित शाहा यांनी आहे. अमित शाहा जे बोलायला सांगतील तेच एकनाथ शिंदे म्हणती. एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही, अमित शाहा यांनी आता तो पक्ष एकनाथ शिंदे यांना संभाळायला दिला आहे. अमित शाहा यांना जे हव तेच एकनाथ शिंदे बोलतील. अमित शाहा दुसरी काय भूमिका घेणार जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत तेच अस वागणार, असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शाहा यांना टोला लगावला आहे.
भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट- संजय शिरसाट
पुढे संजय शिरसाट म्हणाले की, भाजपने काय भूमिका घेतली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे, आम्ही युती म्हणून सर्व निवडणुका लढवाव्या. भाजपाला वाटत असेल कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतंत्र लढायला हवं, तर ही भूमिका शिवसेनेची देखील स्वतंत्र लढण्याची आहे. स्वबळावर लढल्यानंतर निवडणुकीनंतर युती करायची असेल तर युती करायची असेल तर आमची सहमती आहे.
संजय शिरसाट यांच्याकडून संजय राऊतांना प्रत्योत्तर, म्हणाले...
काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा. आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल. आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे. आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये. महायुतीमध्ये लढायचं असेल तर हा म्हणा, नाही लढायचं असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत.
