विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंकडून कारवाईचे संकेत

विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंकडून कारवाईचे संकेत

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय शिवतारे यांच्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत विजय शिवतारे यांची चर्चा झालेली आहे. आमची पण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

जे युतीमध्ये ठरेल ते ठाम. कुणीही वेगळं काही ठरवायचं नाही किंवा करायचं नाही. अजून 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. अन्यथा जर कुणी नाही ऐकलं तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. असे भरत गोगावले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com