Ajit Pawar : बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात जय पवार उतरणार? अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar : बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात जय पवार उतरणार? अजित पवार म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू होती.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात जय पवार उतरणार?

  • आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही

  • काम करून दाखवणं हीच माझी ओळख

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत आज खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आज अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषदेवेळी बोलताना याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. जय पवार(Jay Pawar) हे निवडणूक लढणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

मी पण ती चर्चा ऐकली, पण...

जय पवार बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहेत का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले परंतु तसं काही होणार नाही. असं म्हणत अजित पवारांनी जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही

पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणावरून (Koregaon Park land scam) राज्यात सुरू असलेल्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, “मी आयुष्यात कधीही चुकीचं काम केलं नाही. माझ्या नावाचा वापर करून कोणावरही दबाव आणू नका. चुकीचं काम आजवर केलं नाही आणि पुढेही करणार नाही.” पवार म्हणाले की, “मधल्या काळात काही घटना घडल्या, त्याची चौकशी सुरू आहे. एका महिन्यात वस्तुस्थिती समोर येईल. एक रुपया न भरता कागद कसा तयार झाला हे पाहून मी स्वतःही आश्चर्यचकित झालो. नेमकं काय झालं हे लवकरच समोर येईल. पण निवडणुका सुरू की आरोपांची मालिका सुरू होते. आधीही आमच्यावर आरोप झाले, पण त्यातून काहीच पुढे आलं नाही. मात्र बदनामी मात्र होते.”

काम करून दाखवणं हीच माझी ओळख

अजित पवार म्हणाले की, “घटनेचा आदर करायचा आहे. चुकीचं झालं तर त्यावर बोलू शकतो, पण प्रत्येक वेळी बारामतीचं नाव पुढं करून राजकारण करायची पद्धत अयोग्य आहे. मी कधीही चुकीचं केलं नाही, आणि पुढेही करणार नाही.”अजित पवार यांनी शेवटी ठाम शब्दांत सांगितलं की, “राजकारणात अनेक चढ-उतार आले, पण मी समाधानी आहे. काम करून दाखवणं हीच माझी ओळख आहे, आणि राज्यात लक्ष ठेवूनच पुढचं प्रत्येक पाऊल उचलणार आहे.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com