Lokshahi Pune Sanwad 2025 : Rohit Pawar : काका-पुतणे एकत्र येणार? 'पुणे संवाद'मध्ये रोहित पवारांचा दावा?

Lokshahi Pune Sanwad 2025 : Rohit Pawar : काका-पुतणे एकत्र येणार? 'पुणे संवाद'मध्ये रोहित पवारांचा दावा?

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुणे संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा झाली.

या कार्यक्रमात रोहित पवार सहभागी झाले होते. त्यावेळी रोहित पवार म्हणाले की, "राजकारणामध्ये उद्या जाऊन वेगवेगळं समीकरण बघायला मिळणार आहे. आता राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर तो त्यांचा विषय आहे. उद्या असं आमच्या परिवारामध्ये जर काही घडलं तर दोन नेत्यांमधल्या तो विषय आहे. हा निर्णय शेवटी आमच्या पक्षाकडून पवार साहेब आणि अजितदादा हे त्या पक्षाकडून निर्णय घेणार आहेत. ते जेव्हा निर्णय घेतील आणि सुप्रिया ताई जेव्हा त्याठिकाणी पुढाकार घेतील त्यानंतर त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील."

"गेल्या 5 वर्षामध्ये इतक्या गोष्टी घडल्या आहेत उद्या राजकारणामध्ये जाऊन कुठेही काहीही घडू शकते. काही गोष्टींचे लोकं स्वागत करतील, तर काही गोष्टींचे लोकं स्वागत करणार नाहीत. पण हे जेव्हा घडून येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल याच्यामागे कोण होते? हे जे काही राज्यामध्ये चाललं आहे त्याच्यामध्ये बदल होईल आणि तो लगेच होईल असं मला वाटत नाही. 2029 ला शंभरटक्के झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन चेहरे तेसुद्धा 70टक्के नवीन चेहरे हे राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतील." असं रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com