अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांकडे परतणार? रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांकडे परतणार? रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभेचा निकाल जाहीर झाला. या लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेचा निकाल जाहीर झाला. या लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, ती जी चर्चा आहे ती काही दिवसांपुरती चर्चा राहणार नाही. काही गोष्टी होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतील.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जेव्हा एखादा आमदार आणि तोसुद्धा चांगला असेल आणि त्याला पलिकडे नेलं असेल तर त्याला परत पवार साहेबच घेऊ शकतात. घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण अशा आमदारांना, नेत्यांना घेऊ नये जे साहेबांच्या विरोधात बोलले, विचारांच्या विरोधात बोलले. असं कार्यकर्ता म्हणून आम्ही विनंती करु शकतो. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com